साधला अधिकमासातला शेवटचा बुधवार

भोजाजींच्या चरणी तुफान गर्दी

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
आजनसरा,
Adhik Maas पवित्र अधिकमासातील शेवटचा बुधवार साधत आज १० रोजी श्रीक्षेत्र आजनसरा भतिरसात न्हाऊन निघाली. पुरणपोळीचा प्रसाद व संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली. राज्य शासनाच्या पर्यटन विभागाचा ब दर्जा प्राप्त असलेले हे तीर्थक्षेत्र धार्मिक केंद्र न राहता माणुसकीचे मंदिर बनत आहे. भोजाजी महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे.
 
 
Adhik Maas
 
संत भोजाजी महाराज देवस्थानची वाटचाल आता धार्मिकतेकडून सामाजिक दायित्वाकडे सुरू झाली आहे. याचा प्रत्यय आज येथे येणार्‍या प्रत्येक भाविकाला आला. दर्शनासाठी येणार्‍या भतांच्या सेवेसाठी संस्थानकडून प्रसादालय उभारण्यात आले आहे. येथे हजारो भाविक प्रसाद ग‘हण करतात. भाविकाला आरोग्याची समस्या उद्भवल्यास तातडीने उपचार मिळावेत यासाठी सेवार्थ दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विजय पर्बत व विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनाखाली हे सामाजिक कार्य अविरत सुरू आहे.