मानोरा,
protest by farmer couple तालुक्यातील तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील वयोवृद्ध शेतकरी दाम्पत्य विमल सुखदेव चव्हाण, सुखदेव शामराव चव्हाण आपल्या शेतजमिनीसाठी प्रखर उन्हात आंदोलन करत आहेत.
गट नं. ६२ मधील १:२१ हेटर शेत दहा वर्षांपूर्वी शरद गणपत राठोड यांच्याकडे ३ लाख रुपये उसने म्हणून गहाणखरेदी खताने दिली होती. उपोषणकर्त्यांनी रक्कम हळूहळू परत केली, पण शरद राठोड गहाणखत परत देत नाही. गावातील पंचांनी बसून तोडगा काढला असतानाही तो नाकारला जात जात असल्याचे वृद्ध दांपत्याचे म्हणणे आहे. अर्जदार वयोवृद्ध असून त्यांच्याकडे याशिवाय दुसरी शेतजमीन नाही.protest by farmer couple शरद राठोड व मोरसींग देवसींग राठोड यांचा गावात जोर असल्याने दादागिरीने जमीन बळकावण्याचा धोका आहे. आम्हाला कोणाचेही सहकार्य नाही व आम्ही वयोवृद्ध असल्याने आमरण उपोषण करून जीव संपवण्याच्या मार्गावर असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. आमचा जीव गेला तर शरद गणपत राठोड व मोरसींग राठोड जबाबदार राहतील, निवेदनात नमूद आहे.