दुचाकीची समोरासमोर धडक; दोन गंभीर

नियंत्रण सुटल्याने घडला अपघात

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
कारंजा लाड,
road accident कारंजा-मानोरा मार्गावरील विद्यारंभ शाळेजवळ बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी बाहेरगावी हलविण्यात आले आहे.
 

road accident 
 
 
प्राप्त माहितीनुसार, सकाळच्या वेळेत कारंजा-मानोरा मार्गावर नेहमीप्रमाणे वाहतुकीची वर्दळ सुरू असताना विद्यारंभ शाळेजवळ दोन दुचाकी एकमेकांवर समोरासमोर आदळल्या. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.या अपघातात प्रेमचंद सहारे वय ५२ रा. मध्यप्रदेश आणि गजानन भोपळे वय ५० रा.इंझोरी हे दोघे गंभीर जखमी झाले. दोन वेगवेगळ्या ठिकाणी सावडण्याच्या कार्यक्रमाला जात असताना हा अपघात घडला.अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रस्त्याच्या कडेला सुरक्षित स्थळी हलविले. त्यानंतर जखमींना तातडीने कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात आले. या अपघातामुळे काही काळ कारंजा-मानोरा मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता.road accident दरम्यान, कारंजा-मानोरा मार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे आणि काही ठिकाणी वेगाने वाहने चालविली जात असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
अपघाताची माहिती अजय ढोक यांनी शिवम खोंड यांना दिली असता आई एकविरा व दादाजी रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचून रुग्णाला तत्काळ उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे नेण्यात आले असता पुढील उपचारासाठी अमरावती येथे नेण्यात आले यावेळी मदतीसाठी विजय पांढरे शाम घोडेस्वार संदेश मेश्राम शिवम खोंड उपस्थित होते.