सेलू,
selu-sub-market : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलू उपबाजार आवारात भुईमुग खरेदी हंगामाची दमदार सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी भुईमुगाला विक‘मी दर मिळाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापार्यांमधील चुरशीच्या स्पर्धेमुळे भुईमुगाला प्रतिक्विंटल तब्बल ७,९२५ रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला.
शनिवारी तीळ लिलावानंतर सोमवारी भुईमुग खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्याच दिवशी परिसरातील अनेक शेतकर्यांनी आपला माल विक‘ीसाठी बाजार समितीत आणला. किमान ६,९०० रुपये ते कमाल ७,१२५ रुपये दर मिळाल्याने उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
भुईमुग खरेदी प्रकि‘येचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती केसरीचंद्र खंगारे व उपसभापती प्रमोद आदमने यांच्या हस्ते करण्यात आला.
आवारात शेतकर्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक किंवा फसवणूक होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. भुईमुगासह इतर शेतमालालाही स्पर्धात्मक दर मिळावे यासाठी बाजार समिती सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपला माल बाहेर विकण्याऐवजी बाजार समितीतच आणून अधिक नफा मिळवावा, असे आवाहन त्यांनी केले.
संपूर्ण खरेदी प्रकि‘येचे नियोजन सचिव महेंद्र भांडारकर यांनी केले. यावेळी संचालक रेणुका कोटंबकार, वरूण दफ्तरी, विठ्ठल नानावटे, काशिनाथ लोनकर, गणपत कडू, संदीप वाणी, मनोज तामगाडगे, संजय काकडे, यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.