विशेष स्वच्छता अभियानात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नागपूर,
special cleanliness घोगली येथील सौरभनगर हनुमान मंदिर ते पेट्रोल पंप तसेच नीलकंठ लॉनपर्यंतच्या परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या स्वच्छता मोहिमेत राष्ट्रीय स्वयंसेवकांसह घोगली येथील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. तसेच नगरपंचायतीने लावलेल्या वृक्षांना नियमित पाणी मिळावे आणि त्यांची योग्य वाढ व्हावी यासाठी झाडांच्या भोवती आळे तयार करण्यात आले. परिसर स्वच्छ व हिरवागार ठेवण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे संयोजन अनिल वारेकर यांनी केले. उपस्थितांनी अशा उपक्रमांमुळे पर्यावरण संवर्धनासह स्वच्छतेबाबत जनजागृती होत असल्याचे मत व्यक्त केले.
 
 
special cleanliness
सौजन्य: प्रतिभा वारेकर, संपर्क मित्र