नवी दिल्ली,
Sushmita Dev's resignation पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. राज्यसभा खासदार सुष्मिता देव यांनी पक्षासह राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली असून त्या लवकरच भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राजीनाम्यानंतर सुष्मिता देव यांनी आसामचे मुख्यमंत्री Himanta Biswa Sarma यांची भेट घेतल्याने या घडामोडीला अधिकच राजकीय रंग चढला आहे. या भेटीनंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, टीएमसीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत असंतोष वाढत होता. काही खासदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा दर्शवल्याच्या चर्चांनी पक्षात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर हा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे.दरम्यान, एका आठवड्यात टीएमसीच्या दोन खासदारांनी राजीनामा दिल्याने पक्षातील अस्थिरतेच्या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. काही बंडखोर खासदारांनी पक्षाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत संघटनात्मक बदलांची मागणी केल्याचेही समोर आले आहे. राजकीय घडामोडींच्या या पार्श्वभूमीवर दिल्लीतही हालचाली वाढल्या असून टीएमसीचे काही खासदार संसदेतील वेगवेगळ्या भूमिकांमुळे चर्चेत आले आहेत. पक्षातील वाढता अंतर्गत संघर्ष आणि नेतृत्वावरील नाराजी यामुळे आगामी काळात टीएमसीसमोर मोठी राजकीय आव्हाने उभी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.