कारंजात शाळेतील साहित्य चोरट्यांना अटक

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
कारंजा (घा.), 
thieves-arrested : तालुक्यात असलेल्या काकडा येथील ग्रामविकास विद्यालयात झालेल्या चोरीतील चोरट्यांना बेड्या ठोकण्यात कारंजा पोलिसांना यश आले आहे.
 
 

KL 
 
 
 
पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाळेचे सचिव पुंडलिक बागडे (८०) हे ५ जून रोजी शाळेत गेले असता त्यांना शाळेतील स्वयंपाक खोलीचे दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी गावातील पोलिस पाटलांना बोलावुन आत पाहनी केली असता शाळेतील सिलेंडर, शेगडी, संगणक, ५० किलो तांदुळ आदी साहित्य चोरी गेल्याचे लक्षात आले. या घटनेची कारंजा पोलिसात तक‘ार दाखल करण्यात आली. तक‘ारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात साजन गौरखेडे (२६), धनपाल गोहते (४५), किशोर तिवारी (४५) सर्व रा. काकडा यांनी चोरी केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून शाळेतून चोरीस गेलेले साहित्यासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रल्हाद मदन, सागर महल्ले, प्रवीण चोरे, संदीप कावरे, दिनेश घसाड, रितेश चौधरी यांनी केली.