वर्धा,
Wardha district राज्यात वनाच्छादित क्षेत्राचे प्रमाण ३३ टयांपर्यंत वाढविण्यासाठी ३०० कोटी वृक्ष लागवडीची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १० हजार ४३३ हेटरवर लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे विभागांनी तातडीने वृक्षलागवडीची जागा व रोपांची निश्चिती करावी. पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षारोपण होईल याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिले. वृक्ष लागवड मोहिमेच्या जिल्हास्तरीय नियोजन, समन्वय, अंमलबजावणी व सनियंत्रण समितीच्या बैठकीत त्यांनी सूचना केल्या. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्यासह सामाजिक वनीकरण, वन विभाग, बांधकाम, जलसंपदा, पोलिस, भूजल सर्वेक्षण, भूमी अभिलेख, पंचायत आदी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी पुरेशी झाडांची सं‘या उपलब्ध आहे. विभागांनी लागवडीचे नियोजन करताना जागा निश्चित व नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्या विभागास किती वृक्ष लागणार आहे, याची नोंदणी सामाजिक वनिकरण विभागाकडे करण्यात यावी. विभागांनी यासाठी लागणारा खर्च आपल्या स्तरावर किंवा सामाजिक दायित्व निधीतून भागवावा. नरेगा किंवा अन्य विभागाच्या योजनांचे समायोजन करून वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वीपणे पार पाडावी, असेही जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या.
जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतींनी आपल्या स्तरावर नियोजन करावे. ग‘ामीण भागासाठी तालुकास्तरावर तहसिलदार व गटविकास अधिकार्यांनी नियोजन करावे. ग‘ामपंचायतस्तरावर उत्तम नियोजन करून लागवड करण्यात यावी. महसूल, वन किंवा इतर विभागाच्या जागेवर देखील लागवड करता येईल, यासाठी आवश्यक परवानगी तहसिलदारांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली यांनी सांगितले. ज्या विभागांकडे लागवडीसाठी निधी नाही अशा विभागांना सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वृक्षांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. यावेळी विभागनिहाय वृक्ष लागवडीचा आढावा घेतला.