मुंबई
Tumbadchi Manjula कोरगांवकर दिग्दर्शित ‘तुंबाडची मंजुळा’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रहस्य, विनोद आणि लोककथांचा अनोखा संगम असलेल्या या चित्रपटाला सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. विशेषतः अभिनेता ओम भुतकरने साकारलेला ‘केशव’ आणि त्याच्याभोवती फिरणारे गूढ कथानक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
चित्रपटाच्या पोस्टरमधील साडी परिधान केलेल्या केशवचा आगळावेगळा लूक आणि त्यामागील रहस्य यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या व्यक्तिरेखेचे गूढ आणखी गडद झाले असून, केशवच्या आयुष्यात घडणाऱ्या अनाकलनीय घटनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. कथानकात ‘मंजुळा’ या गूढ व्यक्तिरेखेचा प्रभाव आणि तिचा केशवशी असलेला संबंध उलगडत जात असताना चित्रपटाला वेगळीच रंगत प्राप्त होते.
सध्या तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला ओम भुतकर आपल्या प्रत्येक भूमिकेतून काहीतरी वेगळे सादर करण्यासाठी ओळखला जातो. ‘तुंबाडची मंजुळा’मधील त्याची भूमिका देखील त्याला मिळालेल्या आव्हानांपैकी एक मानली जात आहे. साडीतील त्याचा वेगळा लूक, बदललेली देहबोली, प्रभावी संवादफेक आणि गूढतेने भरलेले सादरीकरण यामुळे ‘केशव’ ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.चित्रपटातील विनोदी प्रसंग, रहस्यमय घडामोडी, भावनिक क्षण आणि कथानकातील महत्त्वाची वळणे यांमध्ये ओम भुतकरचा अभिनय विशेष उठून दिसत आहे. सोशल मीडियावरही त्याच्या या भूमिकेची जोरदार चर्चा सुरू असून, साडीतील केशवचा Tumbadchi Manjula लूक आणि चित्रपटातील रहस्यमय वातावरण याबाबत प्रेक्षकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना ओम भुतकर म्हणाला, “प्रेक्षकांकडून मिळणारा हा प्रतिसाद मनाला सुखावणारा आहे. आपण केलेलं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचतंय आणि त्यांना ते आवडतंय ही अतिशय आनंदाची बाब आहे. ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती आणि ती साकारताना मला खूप मजा आली.”
चित्रपटाचे दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांनीही ओम भुतकरच्या अभिनयाचे कौतुक केले. “मंजुळा ही व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथानकाचा आत्मा आहे. ही भूमिका साकारण्यासाठी अभिनयातील प्रचंड विविधता आणि धाडस आवश्यक होते. ओम भुतकरने या भूमिकेसाठी अफाट मेहनत घेतली. शूटिंगदरम्यान त्याचे या व्यक्तिरेखेशी झालेले एकरूप होणे आम्ही जवळून अनुभवले. आज त्याच्या अभिनयाला मिळणारे प्रेम आणि कौतुक पाहून आम्हाला आनंद होत आहे,” असे ते म्हणाले.