वणीत 40 किलोे संशयित गोमांस जप्त

अंधाराचा फायदा घेत तस्कर फरार

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
वणी,
Vani Police Action गोमांसाची तस्करी होत असल्याच्या माहितीच्या आधारे वणी पोलिसांनी रविवार, 7 जूनच्या रात्री केलेल्या विशेष नाकाबंदीत सुमारे 40 किलो संशयित गोमांस जप्त केले. पोलिसांची चाहूल लागताच दुचाकीस्वार भरधाव वेगाने जात चुंगडी रस्त्यावर फेकून अंधाराचा फायदा घेत फरार झाल्याने शहरात खळबळ उडाली.
 

Vani Police Action 
 
 
एमआयडीसी चौपाटी परिसरात वणी पोलिसांनी विशेष नाकाबंदी केली होती. यावेळी एका दुचाकीस्वाराची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहताच संबंधित इसमाने दुचाकीचा वेग वाढवून पळ काढला. पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, वाघदरा गावाजवळ त्याने दुचाकीवरील चुंगडी रस्त्यावर फेकून दिली आणि अंधाराचा फायदा घेत तो पसार झाला.
 
 
पोलिसांनी घटनास्थळी पडलेली चुंगडी ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे 40 किलो गोमांस आढळून आले. त्यानंतर संबंधित मांस जप्त करण्यात आले असून अज्ञात तस्कराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत.
 
राज्यात गोहत्या आणि गोवंश मांस विक्रीवर कायदेशीर निर्बंध असतानाही काही भागांतून गोमांसाची अवैध तस्करी होत असल्याची चर्चा आहे. विशेषतः तेलंगण व चंद्रपूर परिसरातून गोमांसाची वाहतूक होत असल्याचा संशय असून या संपूर्ण साखळीमागील सूत्रधारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
 
गो-तस्करी व गोमांस विक्री करणाèयांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने यापूर्वीच दिले आहेत. त्यामुळे वणी परिसरातील कथित तस्करी जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी व्यापक तपास मोहीम राबवावी, अशी मागणी आहे.या कारवाईमुळे वणी शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्यामागील संपूर्ण रॅकेट उघडकीस आणण्यात पोलिसांना कितपत यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.