पाण्यासाठी नगरसेवक वाघमारे आक्रमक

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
हिंगणघाट,
vicky-waghmare : प्रभाग १५ मधील तीव्र पाणी समस्येवरून नगरसेवक विकी वाघमारे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारंवार निवेदन देऊनही पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
 
 
 
JLK
 
 
 
प्रभागातील नागरिक पाण्याअभावी त्रस्त असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाईपलाईन लिकेजेस आढळून येत आहेत. काही भागात अमृत योजनेंतर्गत नळ कनेशन देण्यात आलेले नाहीत तर जिथे नळ आहेत तिथे पाणीपुरवठा होत नाही. परिणामी, काही ठिकाणी ना जुन्या नळांमधून पाणी मिळत आहे ना अमृत योजनेचा नळाचा लाभ मिळत आहे.
 
 
नागरिकांच्या घरांमध्ये पाणी पोहोचत नसताना शहरात नळ मीटर बसविण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाणीच मिळत नाही तर मीटर लावण्याचा काय उपयोग? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक विकी वाघमारे यांनी आहे.