आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करा

जिल्हाधिकारी विकास मीना यांचे निर्देश

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Vikas Meena आगामी मान्सूनपूर्व तयारी, पूर व अतिवृष्टीच्या संभाव्य पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी बुधवार, 10 जून रोजी विविध विभागांच्या प्रमुख अधिकाèयांची आढावा बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्वंकष नियोजन करण्याचे निर्देश दिले.
 
 
Vikas Meena
बैठकीस अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड व पूनम अहिरे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी मनोज ढगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
 
यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी सर्व प्रशासकीय विभागांनी समन्वयाने कार्य करून मान्सूनपूर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. अतिवृष्टी अथवा पूरस्थितीत तत्काळ बचाव व मदतकार्य राबविण्यासाठी आवश्यक वाहने, यंत्रसामग्री व प्रतिसाद पथके (रिस्पॉन्स टीम) सज्ज ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
शहरी व ग्रामीण भागातील नाले, गटारे, नदीपात्रे आणि रस्त्यांची साफसफाई तातडीने पूर्ण करावी, जलसंधारणाची कामे पूर्ण करावी, धोकादायक पुलांची तपासणी करावी तसेच तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश त्यांनी दिले. ग्रामस्तरावर आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करून संवेदनशील गावांवर विशेष लक्ष ठेवण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
नदीकाठावरील गावांमध्ये Vikas Meena  उद्घोषणा यंत्रणा कार्यरत ठेवावी, अवैध होर्डिंग्ज हटवावीत, स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित ठेवावीत, तसेच पोलिस प्रशासनानेही सतर्क राहून आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद द्यावा, असे जिल्हाधिकाèयांनी स्पष्ट केले.
बाधित भागांमध्ये मदतकार्य वेळेत पोचण्यासाठी अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. गरोदर महिलांसाठी आरोग्य सुविधा कार्यरत ठेवणे, वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक नियोजन करणे तसेच रस्ते, पूल, शाळा आणि शासकीय इमारतींची स्थिती सुरक्षित असल्याची खात्री करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी मीना यांनी नागरिकांना व संबंधित यंत्रणांना आपत्तीपूर्व सूचना व हवामानविषयक माहिती मिळविण्यासाठी ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ या मोबाईल अ‍ॅप्सचा अधिकाधिक वापर करावा. तसेच आपत्तीचा प्रसंगी मदतीकरिता जिल्हा नियंत्रण कक्षाच्या 07232240720 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतीश मून यांनी मान्सूनपूर्व तयारीबाबत विविध विभागांनी केलेल्या कार्यवाहीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.