वर्धा,
Wardha karate नेपाळ येथील काठमांडू येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये वर्धेच्या खेळाडूंनी १७ पदकांची कमाई केली.२ ते ४ जून रोजी जावलाखेल व्हॉलीबॉल स्टेडियम नेपाळ काठमांडू येथे १७ वी एन. एस. के. ए. आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये भारत, श्रीलंका, कतार, बांगलादेश, नेपाळ व भूटान आदी देशांचा समावेश होता. किमान १ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
काता, कुमिते, टीम काता, टीम कुमिते अशा विविध वजन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. भारताचे प्रतिनिधित्व करीत शिहान दिलीप कठाणे वर्धा आय. एस. के. आय. कराटेच्या खेळाडूंनी मुख्य प्रशिक्षक शिहान दिलीप काठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत मोलाची कामगिरी बजावत तब्बल १७ पदकं पटकावली.
मुलींमध्ये इशिता राहाटे १ रजत,Wardha karate २ कांस्य पदक, स्वरा कावळे २ कांस्य, मुलांमध्ये जय ठकर याने १ रजत, २ कांस्य पदक, शिव राम १ रजत, २ कांस्य, रियांश किटे २ रजत, रिषभ कोरे १ रजत, १ कांस्य, अश्मित नखाते १ रजत आणि १ कांस्य पदक पटकावले. या यशस्वी खेळाडूंचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.