ॲड. प्रभाकर मारपकवार यांच्या निधनाने सच्चा सहकारी हरपला

    दिनांक :10-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Adv. Prabhakar Marpakwar नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी कायदे सल्लागार तसेच पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि प्रेस क्लबचे हितचिंतक अ‍ॅड. प्रभाकर मारपकवार यांच्या आकस्मिक निधनाने संबंधित संस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. संघटनेच्या कायदेविषयक मार्गदर्शनात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते.
 
Adv. Prabhakar Marpakwar
 
१९८२-८३ मध्ये ‘विदर्भ एक्सप्रेस’ सुरू करण्यासाठी पत्रकार संघाने उभारलेल्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. कामगार संघटना व कायदेविषयक विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. एक सच्चा सहकारी हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. नागपूर श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट आणि प्रेस क्लबच्या वतीने प्रदीप कुमार मैत्र, ब्रह्माशंकर त्रिपाठी, अनुपम सोनी, विश्वास इंदूरकर, विनोद देशमुख, प्रभाकर दुपारे आणि जोसेफ राव यांनी संयुक्त श्रद्धांजली अर्पण करत अ‍ॅड. प्रभाकर मारपकवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र