मुंबई,
Announcement of Tanu Weds Manu 3 बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय रोमँटिक-कॉमेडी चित्रपटांपैकी एक मानल्या जाणाऱ्या 'तनु वेड्स मनु' मालिकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, पुन्हा एकदा कंगना रणौत आणि आर. माधवन मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नव्या चित्रपटाला 'तनु वेड्स मनु : द नेक्स्ट चॅप्टर' असे नाव दिल्याची चर्चा असून, या भागातही तनु आणि मनुची भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यशाची नवी उंची गाठली होती. त्यामुळे तिसऱ्या भागाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन मिताक्षरा कुमार करणार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी त्यांनी काही गाजलेल्या प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. निर्मितीची तयारी सुरू झाली असून चित्रपटाचे चित्रीकरण पुढील वर्षात सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, कंगना रणौतच्या भूमिकेबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. मागील भागात तिने दुहेरी भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे यावेळी ती आणखी वेगळ्या अंदाजात दिसणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. काही चर्चांनुसार या भागात तिची एकापेक्षा अधिक भूमिका असू शकते, मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.