सेलू,
Bori Kokate water crisis शासनाच्या ‘जलजीवन मिशन’सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला तालुयातील बोरी (कोकाटे) येथे हरताळ फासला आहे. येथील जलकुंभ तब्बल १४ वर्षांपासून वापराविना उभा असून आजही अनेक नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नाही पूर्वी तर जल जीवन मिशनमध्ये तरी या पाण्याच्या टाकीतून पाणी मिळेल असे वाटत होते. पण, जल जीवन मिशन असेच असन असे वाटले नव्हते.
सन २०१०-११ मध्ये जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले होते. त्यासोबत नवीन विहीर खोदून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. सुरुवातीला ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र कालांतराने ही योजना अपूर्ण अवस्थेतच राहिली आणि जलकुंभ केवळ शोभेची वस्तू बनून राहिला. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ३९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली. परंतु एवढा निधी खर्च होऊनही गावातील अनेक कुटुंबे शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत.
गावातील शांतीनगर परिसरात Bori Kokate water crisis सुमारे ३० ते ४० घरांना आजही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना स्वतःच्या खर्चाने टाया उभाराव्या लागत आहेत. परिणामी पाण्यासाठी होणारी आर्थिक व मानसिक झळ दिवसेंदिवस वाढत आहे.विशेष म्हणजे, एकीकडे गावालगत धरण असूनही दुसरीकडे नागरिकांच्या घशाला कोरड पडत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत खर्च झालेल्या निधीचा हिशोब जाहीर करावा, अपूर्ण कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि गावाला तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गावाच्या विकासासाठी राबविल्या जाणार्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास जनतेचा शासनावरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यत होत असून बोरी (कोकोटे) येथील पाणीप्रश्न आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
योजना आल्या पैसा घेतला...
जलकुंभ तयार झाल्यानंतर गावात पाण्यासाठी विविध योजना आल्या. त्या माध्यमातून नळजोडणीसाठी ग्रामस्थांकडून शुल्कही घेण्यात आले. अनेक नागरिकांनी पैसे भरूनही त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहोचले नसल्याची तक्रार केली आहे.