साकेगाव येथील फासे पारधी समजावर अमानुष हल्ला

*हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा पारधी विकास परिषदेची मागणी *रायपूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
बुलढाणा, 
brutal-attack : रायपूर पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे साकेगाव येथे दि. ९ जून रोजी रात्री येथील फासे पारधी समाजातील महिला पुरुष व लहान मुलावर गावातील गावगुंड तरूणांनी पिण्याच्या पाण्याच्या वादातून अमानुष हल्ला चढविला या हल्लयात महिलांवर लाठीकाठ्यांनी जबर मारहान करण्यात आली. जखमी महिलांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून या संदर्भात रायपूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी फरार आहेत. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पारधी विकास परिषद बुलढाणाचे अध्यक्ष युवराज पवार महासचिव रत्ना पवार, उपाध्यक्ष राजेंद्र पवार यांनी जिल्हाधिकारी या दि. ११ जून रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
 
 
amt
 
 
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे मौजे साकेगाव (रायपूर पोस्टे) येथील फासे पारधी समाजातील २१ महिला पुरुष लहान मुलांवर गावातील ४५ ते ५० गावगुंडानी दि. ९ जून रोजी रात्री ८: ते ९ वाजेदरम्यान पिण्याच्या पाण्याच्या वादातून हल्ला चढविला या हल्यात अर्चना भोसले हिच्या छातीवर वार करण्यात आले. जुली पवार हिचे दात पाडले. हात मोडले लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आली. बिनोज भाई पवार यांच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आले. नितुसिन्हा पवार यांच्या पायावर व हातावर मारहाण करण्यात आली शर्मिला पवार निलम बागुल, रिता पवार, संध्या पवार, दर्‍या पवार, विजय युवराज पवार यासह इतरांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यात आली. गंभीर मारहाण झाालेल्या महिला सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उपचार घेत आहे. उपचार घेऊन परतणार्‍या महिलांना शारिरिक इजा करण्याची धमकी व शिवीगाळ करण्यात आली. रायपूर पोस्टेला १९ जणांविरूद्ध अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अद्याप या गावगुंडाना पोलिसांनी अटक केली नाही. घराची व दुकानांची तोडफोड चारचाकी वाहनांची तोडफोड घरातील वस्तू व धान्य व रोख रक्कम नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी अन्यथा सर्व फासे पारधी समाज संघटना आंदोलन छेडतील अशा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर इंद्रराज पवार, विक्की भोसले, वदंना पवार, संजय भोसले, अक्षय पवार, रेश्मा भोसले, राजा पवार, नरेश भोसले, अबेदान पवार विरोद भाई पवार यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.