दारव्हा पोलिसांनी शोधले 50 हून अधिक हरविलेले मोबाईल फोन

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
darwha-police : मागील काही वर्षांत हरवलेल्या नागरिकांच्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी दारव्हा पोलीस ठाण्याने सीईआयआर पोर्टलचा प्रभावी वापर करत 50 हून अधिक मोबाइल शोधून काढण्यात यश मिळविले आहे. त्यापैकी प्राथमिक टप्प्यात 11 मोबाइल संबंधित मूळ मालकांना परत करण्यात आले.
 
 

hnjk 
 
 
 
दारव्हा पोलिस ठाणेदार सुनील गोपीनवार यांच्या हस्ते बुधवारी या फोन्सचे वितरण करण्यात आले. सीईआयआर पोर्टलचे काम पाहणारे जमादार मोबीन पठाण यांनीही हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मोबाइल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी दारव्हा पोलिसांचे आभार मानले.
 
 
महातोली येथील अमोल वानखेडे यांनी सांगितले की, माझा मोबाईल दोन वर्षांपूर्वी हरविला होता. त्याबाबत मी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. मोबाईल पुन्हा मिळेल, अशी अपेक्षाच सोडून दिली होती. मात्र, पोलिसांच्या प्रयत्नांमुळे माझा मोबाइल परत मिळाला.
 
 
हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेऊन तो नागरिकांच्या ताब्यात देण्याच्या उपक्रमामुळे येथील पोलिसांची कार्यक्षमता व सेवाभावाचे कौतुक होत आहे.