अन् दारूच्या शिश्यांवर चालला रोड रोलर

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
देवळी,
Deoli liquor destruction operation स्थानिक पोलिसांनी २०२१ ते आजपर्यंत विविध देशीविदेशी दारूच्या कारवाईत जप्त केलेल्या ११ लाख १६ हजार २६० रुपयांच्या दारुसाठ्यावर रोडरोलर चालवून नष्ट केला. ऐवरी रस्त्यावर चालणारा रोड रोलर आज दारू भरून असलेल्या काचेश्या शिश्यावर चालत होता.
 

Deoli liquor destruction operation 
न्यायालयाने आदेश दिल्याने आज गुरुवार ११ रोजी १०१ गुन्ह्यातील ५ हजार ४१६ देशीविदेशी दारूच्या बाटल्या, ८ लाख ६२ हजार ६० रुपये, १४ गुन्ह्यातील १ हजार ९८० देशीविदेशी दारूच्या बाटल्या, किंमत २ लाख ५४ हजार २०० रुपये, अशा ११५ गुन्ह्यातील ११ लाख १६ हजार २६० रुपयांचा दारुसाठा निर्जनस्थळी नेऊन त्यावर रोड रोलर चालवून नष्ट केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा, देवळी ठाण्यातील कर्मचारी यांच्या उपस्थित करण्यात आली.