रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
wild-boar-attack : तालुक्यातील बिजोरा परिसरात पहाटेच्या सुमारास रानडुकराच्या हल्ल्यात एका शेतकèयाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. या घटनेत दीपचंद सुभाष चव्हाण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत.
 
 
 
lk
 
 
 
दीपचंद चव्हाण आणि त्यांचे पुतणे अतुल सुरेश चव्हाण हे शुक्रवारी पहाटे 4 वाजता बिजोरा येथील शेतात स्प्रिंकलर बदलण्यासाठी मोटारसायकलने जात होते. अंधारात अचानक समोर आलेल्या रानडुकराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
 
 
धडक दिल्यानंतरही रानडुक्कर आक्रमक झाल्याने त्याने दीपचंद चव्हाण यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या नाक, कपाळ व डोळ्यांजवळील भागाला गंभीर जखमा झाल्या असून उजव्या पायालाही मोठी दुखापत झाली आहे. उपचारासाठी तत्काळ दारव्हा येथे आणण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने वैद्यकीय अधिकाèयांनी त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले.
 
 
दरम्यान, बिजोरा क्षेत्रात रानडुकरांचा वाढता वावर शेतकरी आणि नागरिकांसाठी धोक्याचा विषय बनला आहे. वन विभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.