मुंबई,
fifa-world-cup-2026 : फुटबॉल चाहत्यांची उत्सुकता अखेर संपली असून फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेला ११ जूनपासून सुरुवात होत आहे. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली होत असलेला हा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा ठरणार आहे. यंदाच्या स्पर्धेत ४८ संघ सहभागी होत असून एकूण १०४ सामने खेळवले जाणार आहेत.
भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठीही आनंदाची बातमी आहे. फिफा स्पर्धांच्या भारतातील प्रसारण हक्कांसाठी झी एंटरटेनमेंटने फिफासोबत करार केला असून त्यामुळे विश्वचषकातील सामने भारतीय प्रेक्षकांना पाहता येणार आहेत.
कुठे पाहता येणार सामने?
फिफा विश्वचषक २०२६ मधील सर्व सामने भारतात ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थेट पाहता येणार आहेत. तसेच टीव्ही प्रेक्षकांसाठी विविध क्रीडा वाहिन्यांवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
किती आहे सबस्क्रिप्शन फी?
विश्वचषकासाठी ZEE5 ने दोन प्रमुख प्लॅन उपलब्ध करून दिले आहेत.
३ महिन्यांचा प्लॅन – ₹७९९
वार्षिक प्लॅन – ₹१६९९
दिग्गज तज्ज्ञांचे विश्लेषण
स्पर्धेच्या कव्हरेजसाठी अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फुटबॉल दिग्गजांना जोडण्यात आले आहे. यामध्ये ऑलिव्हर कान, बायचुंग भुतिया, गुरप्रीत सिंग संधू, अदिती चौहान, इगोर स्टिमॅक, ॲशली वेस्टवूड, रॉबिन सिंग, पॉल मेसफिल्ड, सीमा जसवाल, खुरी इराणी आणि अर्जुन पंडित यांचा समावेश आहे.
प्रमुख सामने
विश्वचषकाच्या सुरुवातीलाच अनेक मोठे सामने रंगणार आहेत. ब्राझील, फ्रान्स, अर्जेंटिना, इंग्लंड आणि स्पेन यांसारख्या बलाढ्य संघांचे सामने चाहत्यांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत.
अंतिम सामना कधी?
स्पर्धेचा महाअंतिम सामना १९ जुलै २०२६ रोजी न्यू जर्सी येथे खेळवला जाणार आहे. ४८ संघ आणि १०४ सामन्यांमुळे हा विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठा आणि रोमांचक विश्वचषक ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.