महिलां सक्षमीकरणासाठी प्रशिक्षण व उत्पादन केंद्राचा शुभारंभ

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
नागपूर,
InfoCepts Nagpur ग्रामीण भागातील महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने इन्फोसेप्ट्सच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत ‘प्रशिक्षण व उत्पादन केंद्र’ (टीसीपीसी) उषा शिवणकला विद्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम अफार्म, पुणे, निसर्ग विज्ञान मंडळ, नागपूर आणि उषा शिवणकला विद्यालय यांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.

honk 
 
इन्फोसेप्ट्सचे संचालक दिनेशकुमार गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. InfoCepts Nagpur केंद्रासाठी निवडलेल्या २५ महिलांना २५ दिवसांचे प्रशिक्षण व त्यानंतर ९० दिवसांचा प्रत्यक्ष सराव दिला जाणार आहे.या प्रशिक्षणामुळे महिलांना शिवणकलेचे व्यावसायिक कौशल्य मिळून रोजगार व स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
सौजन्य: डॉ. विजय घुगे, संपर्क मित्र