आनंदवार्ता...लाडक्या बहिणींचा हप्ता लवकरच येणार!

राज्य सरकारकडून 344 कोटी मंजूर

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
मुंबई,
installment for Ladki Bahin scheme मुंबईतून राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री 'माझी लडकी बहिण योजने'अंतर्गत मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या हप्त्यासाठी राज्य सरकारने 344 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. महिला व बालविकास विभागाकडून सर्व आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर आता थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे रक्कम हस्तांतरित करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हप्ता लांबणीवर पडल्याने चिंतेत असलेल्या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
 
cm
 
दरम्यान, या योजनेबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांवरही सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. योजना बंद होणार किंवा हप्ते थांबणार अशा चर्चांना कोणताही आधार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता जसा नियमितपणे जमा करण्यात आला होता, तसाच मे महिन्याचाही हप्ता वेळेत वितरित केला जाणार असल्याचे अधिकृत पातळीवर सांगण्यात आले आहे.राज्यात या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता राखण्यासाठी नियमित पडताळणी सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे समोर आले असून अशा अपात्र लाभार्थ्यांचे हप्ते थांबवण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.सरकारकडून अशा प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून उर्वरित संशयास्पद प्रकरणांचीही तपासणी केली जात आहे. त्यामुळे योजनेचा लाभ फक्त खऱ्या पात्र महिलांपर्यंतच पोहोचावा, हा सरकारचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.