नागपूर,
Kaikadi Nagar Camp रा. स्व. संघ व लोककल्याण समितीच्या वतीने कैकाडी नगर सेवा वस्ती येथे १ ते १० जूनदरम्यान आयोजित बालसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहात झाला. भारतमाता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.संस्कार वर्गातील विद्यार्थ्यांनी श्लोक, बडबडगीते, व्यायाम, सूर्यनमस्कार आदींचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. अजनी भाग सहसेवा प्रमुख पद्माकर साठे यांनी मुलांना प्रेरणादायी गोष्ट सांगितली.
भोजन मंत्र व कल्याण मंत्रानंतर खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, वर्ग शिक्षिका व पालक उपस्थित होते. Kaikadi Nagar Camp शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी केशव प्रभात शाखा, शामनगर शाखा, स्थानिक नागरिक तसेच नगरसेविका पूजा भूगावकर यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य: रितिका काशीमकर,संपर्क मित्र