अकोला
Katepurna River drowning अकोला-मुर्तीजापुर तालुक्यातील समशेरपुर गावाजवळील काटेपूर्णा नदीपात्रात एक हृदयद्रावक घटना गुरुवार,११ जून च्या सकाळी सहा वाजता घडली. आंघोळीसाठी गेलेल्या तीन महिला व एका मुलांपैकी मायलेकाचा बुडून मृत्यू झाला आहे.तर इतर दोन महिला पाण्यात बुडताना बचावल्या असून त्या दोघींना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा नैसर्गिक व आपत्ती विभागाचे प्रमुख संदीप साबळे यांनी दिली.
मूर्तिजापूर तालुक्यातील समशेरपुर गावातील तीन महिला व एक मुलगा गावाजवळ असलेल्या काटेपूर्णा नदिवर आंघोळ करण्याकरिता गेल्या असता त्यापैकी वृषाली हरिदास खोत (३५) व त्यांचा मुलगा स्वराज हरिदास खोत (१०) यांचा नदित बुडून मृत्यु झाला आहे, तसेच माधुरी उमेश खोत व मीरा श्यासुंदर चौधरी या दोन महिला पाण्यात बुडतांना वाचल्या असून त्यांना अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर बुडालेल्या दोन्ही मृतदेहाचा गावकऱ्यांच्या मदतीने शोध लागला असून शवविच्छेदन करिता मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.सूत्रांच्या माहितीनुसार अधिक मास निमित्त काटेपूर्णा नदीपात्रात आंघोळीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या दररोज मोठ्या प्रमाणात असते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातूनच ही घटना घडली असा अंदाज आहे.
समशेरपुर जवळील Katepurna River drowning काटेपूर्णा नदीपात्रात या महिला पूजेसाठी गेल्या असता यातील एक महिला व मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. यातील बचावलेल्या दोन महिलांवर अकोला जिल्हासर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून तर उपजिल्हा मुर्तीजापुर रुग्णालयात महिला व त्या मुलाचे मृतदेहाचे शवविच्छेदन होणार आहे.
शिल्पा बोबडे
तहसीलदार, मूर्तिजापूर