आई बनल्यानंतर कैटरिना कैफ करणार धमाकेदार कमबॅक

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
मुंबई
Katrina Kaif  बॉलिवूडमधील अनेक आघाडीचे कलाकार गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले असून, आता अभिनेत्री कैटरिना कैफही डिजिटल विश्वात पदार्पण करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. विविध वेब सिरीज आणि डिजिटल चित्रपटांच्या प्रस्तावांवर कतरिना विचार करत असल्याची माहिती समोर आल्याने तिच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Katrina Kaif  
माधुरी दीक्षित, सैफ अली खान, करीना कपूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, राधिका आपटे आणि अलीकडेच करिश्मा कपूर यांसारख्या कलाकारांनी ओटीटी माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशा परिस्थितीत कतरिनाही या माध्यमातून पुनरागमन करणार असल्याच्या बातम्या मनोरंजन विश्वात चर्चेचा विषय ठरत आहेत.
गेल्या काही काळापासून Katrina Kaif  कैटरिना रुपेरी पडद्यापासून दूर आहे. अभिनेता विकी कौशलसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर तिने निवडक प्रकल्पांमध्ये काम केले. त्यानंतर मातृत्व स्वीकारल्यानंतर तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य देत चित्रपटसृष्टीपासून काही काळ अंतर ठेवले होते. त्यामुळे तिच्या पुनरागमनाची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली होती.