सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या मागण्या मान्य

कुंभार समाजाला मिळाला दिलासा

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
पुलगाव
Sakal Kumbhar Samaj Vikas Parishad सकल कुंभार समाज विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने कुंभार समाजाचा राज्यस्तरीय मेळावा २२ फेब्रुवारी रोजी वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी कुंभार समाजाच्या विविध प्रलंबित समस्यांचे आणि मागण्यांचे निवेदन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना दिले होते. कायम भाजपासोबत जुळून असलेल्या कुंभार समाजाच्या न्याय मागण्यांवर राज्य शासनाने शिका मोर्तब केला आहे. त्यामुळे कुंभार समाजाला दिलासा मिळाला असे गोरोबा काका विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष संजय गाते यांनी कळवले आहे.
 

Kumbhar Samaj demands accepted, Sakal Kumbhar Samaj Vikas Parishad, 
कुंभार समाजाला न्याय मिळावा या मागण्यांसाठी सकल कुंभार समाज विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे १३ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व राज्यमंत्री ना. डॉ. पंकज भोयर यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीत कुंभार समाजाच्या महत्त्वाच्या मागण्यांना मंजुरी देण्यात आली
या निर्णयामुळे कुंभार समाजाला पारंपरिक व्यवसायाकरिता सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना भेडसावणार्‍या अडचणी दूर होणार आहेत. शासनाने घेतलेल्या निर्णयात पिढीजात कुंभार समाजाच्या कुटुंबाला त्यांच्या व्यवसायासाठी वर्षाला ७०० ब्रासपर्यंत माती किंवाSakal Kumbhar Samaj Vikas Parishad  गौण खनिज काढण्यास स्वामित्वधन भरावे लागणार नाही. पारंपरिक व्यवसाय करणार्‍यांना संबंधित तहसीलदारांकडून ओळखपत्र देण्यात येणार, मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांमधील गाळ किंवा माती ७०० ब्रासच्या मर्यादेत स्वतःच्या खर्चाने काढून नेल्यास स्वामित्वधन आकारले जाणार नाही. रोजगार मिळवून देण्यासाठी शासकीय क्षेत्र उपलब्ध करून ’लस्टर’ तयार केले जातील. शेतजमिनीवर वीटभट्टीसाठी वापर अनुज्ञेय असल्यामुळे स्वतंत्रपणे अकृषक परवाना घेण्याची आवश्यकता नाही. वीटभट्टी धारकांसाठी औष्णिक विद्युत केंद्रातील ६०:२०:२० या सूत्रानुसार राखेचे वाटप केले जाईल, आदी फायदे मिळणार आहेत.
 
कुंभार समाजाच्या या न्याय्य मागण्या मान्य करून पारंपरिक कारागिरांना बळ दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री वर्धा जिल्हा डॉ. पंकज भोयर यांचे सकल कुंभार समाज विकास परिषदेच्या वतीने गाते यांनी आभार मानले.