तभा वृत्तसेवा
हदगाव,
maha-aarti-in-dongargaon : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केल्याच्या निमित्ताने हदगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे माता जगदंबा मंदिरात विशेष पूजा व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपा दक्षिण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.
यावेळी भाजपा दक्षिण मंडळाध्यक्ष सूर्यकांत हनवते, डॉ. भगवान निळे, शेषराव मुलगीर, मोहन दहेकर, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम भक्तीमय वातावरणात झाला.