नवी दिल्ली,
MC rises due to a series of resignations. नवी दिल्लीमध्ये तृणमूल काँग्रेसला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे राज्यसभा खासदार प्रकाश चिक बराइक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ निर्माण झाली आहे. याआधीच पक्षातील काही खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याचे चित्र दिसत होते. आता बाराईक यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद अधिक तीव्र झाल्याचे मानले जात आहे. राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे संख्याबळ 10 असून लोकसभेत 28 खासदार आहेत, तरीही पक्षात असंतोष वाढत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

बाराईक हे तृणमूल काँग्रेसमधील आदिवासी समाजाचे महत्त्वाचे चेहरे मानले जातात. पश्चिम बंगालमधील अलीपूरद्वार जिल्ह्यातून ते राजकारणात सक्रिय झाले होते. राजकारणात येण्यापूर्वी ते चहाच्या मळ्यात कामगार संघटनांशी जोडलेले होते. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचा प्रभाव मोठा मानला जातो.पक्षात ते अभिषेक बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मानले जात होते. 2023 मध्ये त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. त्यांनी 2024 लोकसभा निवडणूकही लढवली होती. मात्र आता त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील संघटनात्मक एकजूट पुन्हा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजीनामे आणि नाराजीच्या घटनांमुळे पक्ष नेतृत्वावर दबाव वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात पक्ष आपली अंतर्गत ताकद कशी टिकवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.