नागपूर,
New Diamond Nagar पूर्व नागपूरातील खरबी रोडलगतच्या न्यू डायमंड नगर परिसरात वारंवार वीज खंडित होणे आणि कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कमी व्होल्टेजमुळे कुलर, पंखे व इतर विद्युत उपकरणे व्यवस्थित चालत नसल्याने उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यासंदर्भात अनेकदा निवेदने देऊनही समस्या न सुटल्याने नागरिकांनी महावितरण कार्यालयात धडक देत मुख्य अभियंत्यांची भेट घेतली. New Diamond Nagar यावेळी परिसरात तातडीने नवीन डीपी (विद्युत रोहित्र) बसविण्याची मागणी करण्यात आली.निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते राहुल अभंग, नितीन रामटेककर, पंकज चापले, क्षितिज इंगळे, सौरभ काळमेघ आणि सुरेशराव जिचकार उपस्थित होते. नागरिकांनी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
सौजन्य:अंशुल जिचकार,संपर्क मित्र