ज्येष्ठ दिग्दर्शक पी. भारतीराजा यांचे निधन

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
चेन्नई,
P Bharathiraja death तामिळ चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक, अभिनेते आणि ग्रामीण वास्तववादी चित्रपटांचे जनक म्हणून ओळखले जाणारे पी. भारतीराजा यांचे चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसह संपूर्ण भारतीय मनोरंजनविश्वात शोककळा पसरली असून अनेक कलाकार, दिग्दर्शक आणि चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
 

P Bharathiraja death 
गेल्या काही वर्षांपासून भारतीराजा वयोमानानुसार उद्भवणाऱ्या विविध आरोग्य समस्यांशी झुंज देत होते. विशेषतः 2025 मध्ये त्यांचा मुलगा आणि अभिनेता मनोज भारतीराजा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्याचे सांगितले जाते. श्वसनासंबंधी त्रास वाढल्यामुळे त्यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर यंदाही प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर एप्रिल महिन्यात त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, अखेर बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.