वणी,
raid-on-illegal-liquor-shop : कोसारा येथे मारेगाव पोलिसांनी धडक कारवाई केली असुन या कारवाईत 145 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहे. अमोल नारनवरे आणि सुलोचना नंदलाल जैस्वाल अशी अवैश दारू विक्रेत्यांची नावे आहे. यावेळी दोघांपैकी एका जवळुन 90 मिलीच्या 120, तर दुसèयाजवळून 25 अशा 145 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या मुद्देमालाची किंमत 7120 रुपये असून दारू विक्री करणाèयांवर दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. या धाड पथकामध्ये मारेगाव पोलिस ठाणेदार श्याम वानखेडे, सहनिरीक्षक शंकर बारेकर, सहायक उपनिरीक्षक दिगांबर किनाके, नरेंद्र तुमराम, विकास खंदारे, बबिता तोडासे व अतुल सरोदे यांचा समावेश आहे.