नाल्यांची सफाई करा

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
सेलू
Selu drain cleaning demand पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे मागील वर्षी सारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पूर्व तयारी करावी यासाठी सेलू भाजपा व भाजयुमो ने नगर पंचायला निवेदन देऊन साकडे घातले आहे. शहरातील नाले व नदी साफसफाई करण्याकरिता नगरपंचायत येथे बुधवारी निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने वडगाव, रेहकी रोड वरील पावसाळी पाण्याची उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली आहे. शहरातून सहकारी बँकेजवळ निघणारा नाला, त्याच प्रमाणे नव्याने पडलेल्या ले आऊट मधील पाणी व शहरातील नाल्यांची नियमित साफसफाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी सेलू तालुका अध्यक्ष प्रफुल खोडे, मनोज केळझरकर, शिवा डुकरे, दिनेश कामीनकर, राहुल नागपूरे, बादल सहारे, धीरज पवनारकर, संदीप उराडे, आशिष मसराम, हितेश लाखे, गौरव भलमे, आदी उपस्थित होते.
 

Selu drain cleaning demand