वर्धेत शतिपीठ महामार्गाला शेतकर्‍यांची ताकद!

अभिनेते भारत गणेशपुरे यांनी साधला संवाद

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
वर्धा,
Shaktipeeth highway महाराष्ट्र राज्य शतिपीठ महामार्ग प्रकल्पाच्या उभारणीला आता गती मिळू लागली असून या महत्त्वाकांक्षी महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून होत आहे. राज्यातील प्रमुख धार्मिक, आर्थिक आणि औद्योगिक केंद्रांना जोडणारा हा महामार्ग भविष्यातील प्रगतीचा नवा मार्ग ठरणार असून, या प्रकल्पाबाबत जनजागृती आणि संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)कडून शतिपीठ संवाद यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेचा पहिला टप्पा वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथे अलीकडेच उत्साहात पार पडला. ज्येष्ठ अभिनेते भारत गणेशपुरे यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला.
 

ser  
यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, एमएसआरडीसी मुख्य अभियंता साहेबराव सुरवसे उपस्थित होते. त्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. संभाव्य फायदे स्पष्ट केले आणि जमीन संपादन प्रक्रियेत पारदर्शकता व न्याय्य मोबदल्याची हमी दिली. शतिपीठ महामार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेले लोकसहभागाचे पायाभूत काम यशस्वीपणे सुरू झाल्याचे चित्र पवनार येथे पाहायला मिळाले.
विशेष म्हणजे, समृद्धी महामार्गामुळे झालेल्या विकासाचा प्रत्यक्ष अनुभव मांडताना अनेक शेतकर्‍यांनी नव्या संधी, वाढलेली जमीनमूल्ये आणि रोजगारनिर्मिती यांचा उल्लेख केला. ज्यामुळे शक्तीपीठ महामार्गाविषयीही आशावाद अधिक बळकट झाला आहे.
 
 
शक्तीपीठ महामार्गाच्याShaktipeeth highway  माध्यमातून समृद्धी महामार्गापेक्षा अधिक लांब महामार्ग उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. समृद्धी महामार्ग ७०१ किमी तर शक्तीपीठ महामार्ग ८५६ किमीचा आहे. शक्तीपीठ महामार्गाचा फायदा विदर्भासह मराठवाड्याला होणार आहे. शक्तिपीठासाठी वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील सेशन १८ पूर्ण झाले असून सद्यस्थितीत भूसंपादन निवाड्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकर्‍यांनी जमीन देण्यास समंती दर्शविली तर लगेच शेतकर्‍यांना मोबदला देण्यात येईल असे मिश्रा यांनी सांगितले.
आपली समृद्धी महामार्गात जमीन गेली. त्यावेळी आपल्याला ८२ लाख हेटर प्रमाणे मूल्यांकन करण्यात आले. असे मला तीन हेटर जमिनीचे सुमारे ३ कोटी रुपये मिळाले. सर्व प्रक्रिया अगदी पारदर्शक पद्धतीने झाली. आता आपण समृद्ध शेतकरी असल्याचे प्रगतशील शेतकरी प्रशांत इंगळे यांनी सांगितले.