वर्धा,
Sharad Pawar, जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांना शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सादर केला.
जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शप) च्या संघटनात्मक बांधणीसह भविष्यातील पक्षाची वाटचाल, कार्यकर्त्यांचे सक्षमीकरण, युवकांना पक्षाशी जोडण्याचे प्रयत्न आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर पक्षाची भूमिका याबाबत चर्चा करण्यात आली.
पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविणे, सर्वसामान्य नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि विकासाभिमुख राजकारणाला प्राधान्य देण्याचे मार्गदर्शन केले. वर्धा जिल्ह्यात पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहनही शरद पवार यांनी केले असल्याचे वांदिले यांनी कळवले आहे.