भीषण अपघात ‘शिवाई’ बसची कंटेनरला पाठीमागून धडक पाच जण जखमी

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
वाशीम,
Shivai bus accident Washim वाशीम ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार ११ जून रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास वाशीम तालुयातील तोंडगाव फाट्याजवळ हिंगोली ते अमरावती प्रवास करणार्‍या शिवाई बसने समोर चालणार्‍या कंटेनरला पाठीमागून जबर धडक दिली. या अपघातात बस व कंटेनर चालकासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
 

Shivai bus accident Washim  
प्राप्त माहितीनुसार, हिंगोलीवरून अमरावतीकडे जाणारी शिवाई बस चालक प्रशांत चव्हाण आणि वाहक नामदेव मानकर यांच्यासह एकूण १६ प्रवासी घेऊन महामार्गावरून मार्गस्थ होती. वाशीम तालुयातील तोंडगाव फाट्याजवळ आल्यानंतर बसच्या पुढे असलेल्या कंटेनरला मागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बस समोरील ट्रक रस्त्यावर आडवा पडला आणि बस रस्त्याच्या कडेला गेली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
या अपघातात पाच जण Shivai bus accident Washim  गंभीर जखमी झाले. त्यामध्ये प्रशांत रंगराव चव्हाण (बस चालक), प्रल्हाद धोंडुआप्पा झळके (प्रवासी) आणि दौलु पठाण (प्रवासी) आणखी एक प्रवाशी व कंटेनरचालक यांचा समावेश आहे. जखमीवर वाशीम व हिंगोली येथे उपचार सुरु आहेत.
सुरुवातीला कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे हा अपघात झाल्याचा बनाव बसच्या कर्मचार्‍यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे सांगीतले.