शिरपूर जैन,
Nag Nath temple येथील प्रख्यात असलेले अति पुरातन श्री नागनाथ संस्थानच्या परिसरात कैलास भालेराव यांच्या शेतात खोदकाम सुरू असताना शिवलिंग आाढळले असल्याची घटना ९ जून रोजी घडली. सदर शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
शिरपूर हे गाव विविध देवता, साधू संत, महात्मे यांची पावनभूमी आहे. येथे विविध जाती धर्माचे संस्थाने आहेत, त्यातील एक अति पुरातन हेमाडपंथी बांधकामचे असलेले श्री नागनाथ संस्थान हे गावाच्या पूर्वेकडे स्थित आहे. येथे दर्शनासाठी भाविकांची नेहमीच वर्दळ असते. या मंदिराचा इतिहास फार पुरातन आहे. या मंदिराच्या परिसरात मंगळवार, ९ जून रोजी खोदकाम करताना शिवलिंग आढळले. शिरपूर येथील कैलास भालेराव नागनाथमंदिर जवळ राहतात, त्यांना एका रात्री स्वप्नामध्ये स्वयं भगवान महादेवांचे दर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले.
सदर मंदिर परिसरात शिवलिंग Nag Nath temple मिळाल्याने भाविकांची भक्ती व श्रद्धा अजूनच दृढ झाली. सदर शिवलिंगाचे यावेळी विधीवत पूजन करण्यात आले. सदर मंदिर परिसरातील येथील भालेराव यांच्या शेतात हे शिवलिंग अवतरले. मुळात ते देखील धार्मिक वृत्ती असलेले व्यक्ती आहेत. त्यांच्या शेतात अवघ्या दोन फूट खोदल्यानंतर हे शिवलिंग आवतरले. श्री नागनाथ संस्थान येथे शिव भाविकांची मोठी श्रद्धा आहे. येथील परिसरात शिवलिंग आवतरल्याने यावेळी भाविकांनी एकच गर्दी केली होती.
यावेळी भालेराव यांनी सांगीतले की, दिव्य स्वप्नात महादेवांनी आदेश दिला की, तुझ्या शेतातील रस्त्यावर असलेल्या शिवलिंगावरुन २५ वर्षापासून ये जा करतो. रस्त्यात या ठिकाणी २ फूट खोल खोदकाम केल्यास तुला माझे अस्तित्व जाणवेल, असे घडल्याचे सांगण्यात येते. याबाबत गावात बातमी पोहोचताच भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सदर नागनाथ संस्थान हे पुरातन शिवाचे पावन ठिकाण आहे. त्यामुळे येथे शिवलिंग सापडणे साहजिक आहे. या परिसरात श्री नागनाथ संस्थानला मानणारे भरपूर भाविक आहेत.