आर्णी तालुक्यात सुकळी परिसरात वादळी पाऊस

फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
stormy-rain : तालुक्यातील सुकळी गावाच्या परिसरात बुधवार, 10 जूनला संध्याकाळी 5.30 च्या सुमारास चक्रीवादळासह पाऊस झाल्याने शेतकèयांच्या शेतातील फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकèयांकडून होत आहे.
 
 
 
y11Jun-Sukali
 
 
 
आर्णी तालुक्यातील सुकळी परिसरात चक्रीवादळासह पाऊस झाला. लोणबेहळ येथील युवा शेतकरी नीलेश भुजंग आचमवार यांचे सुकळी शेतशिवारात साडेतीन एकर शेत आहे. त्यांनी 1.28 हेक्टरमध्ये लिंबाची झाडे आहेत.
 
 
या चक्रीवादळामुळे या शेतकèयाच्या शेतातील जवळपास 100 लिंबाची झाडे बुडापासून उखडून पडली. त्यामुळे शेतकèयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. नीलेश आचमवार यांच्या शेतातील फळबागेच्या नुकसानाची पाहणी करून कृषी सहायक ज्योती बोडखे व तलाठी बन्सोड यांनी पंचनामा करून प्राथमिक अहवाल तहसील कार्यालताकडे सादर केला आहे.