सनी लिओन सीआयडीच्या रडारवर

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
मुंबई,
Sunny Leone on CID's radar. कर्नाटकातील तब्बल 2400 कोटी रुपयांच्या कथित गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिचे नाव समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या कर्नाटक सीआयडीने तिला आर्थिक व्यवहारांबाबत माहिती देण्यासाठी नोटीस बजावली आहे. या घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात कर्नाटकच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू असून ‘शिवम असोसिएट्स’ आणि त्याचा प्रवर्तक शिवानंद नीलण्णवर यांच्यावर बेकायदेशीर गुंतवणूक योजनांद्वारे सुमारे चार लाख गुंतवणूकदारांकडून हजारो कोटी रुपये उभारल्याचा आरोप आहे. या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सध्या सुरू आहे.
 
 
Sunny Leone on CID
 
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका कन्नड चित्रपटात सनी लिओनीने विशेष आयटम सॉंगमध्ये सहभाग घेतला होता. या गाण्यासाठी तिला सुमारे 1 कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. या रकमेसाठी वापरलेला निधी कुठून आला आणि व्यवहार कसा झाला, याचा तपास सीआयडी करत आहे.अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की सनी लिओनीवर सध्या कोणताही गुन्हा दाखल नाही आणि तिच्यावर फसवणुकीचे आरोपही नाहीत. तिला फक्त माहिती मिळवण्यासाठी आणि आर्थिक व्यवहारांची सत्यता तपासण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे. या घोटाळ्याच्या तपासात आणखी अनेक आर्थिक धागेदोरे समोर येण्याची शक्यता असून सीआयडीकडून संबंधित कागदपत्रांची सखोल पडताळणी सुरू आहे. त्यामुळे पुढे या प्रकरणात काय नवे खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.