राज्यभर संताप! परप्रांतीयाची वृद्धाला बेदम मारहाण

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
ठाणे,
Ola driver beats elderly man ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल परिसरात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून एका परप्रांतीय ओला चालकाने एका वृद्ध व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
 

 Thane Jupiter Hospital assault, Ola driver beats elderly man 
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास वृद्ध व्यक्ती आणि ओला चालक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर अचानक हिंसाचारात झाले. संबंधित ओला चालकाने वृद्ध व्यक्तीला धक्का देत त्याच्या कानशिलात लगावली आणि त्याला जमिनीवर पाडले. त्यानंतरही चालकाने मारहाण सुरूच ठेवली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
घटनेदरम्यान एका वृद्ध महिलेने मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी चालकाने कोणाचेही ऐकले नाही. काही नागरिकांनी हस्तक्षेप करून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तरीही तो आक्रमकच राहिला. जमिनीवर पडलेल्या वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ करत मारहाण सुरूच राहिल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट ठाणे पोलीस आयुक्तांना फोन करून तात्काळ कारवाईचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण Ola driver beats elderly man  सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मारहाण झालेल्या वृद्ध व्यक्तीशी फोनवर संवाद साधल्याचे सांगण्यात येत आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनीही या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली असून पीडित व्यक्ती आणि राज ठाकरे यांच्यातील संवाद घडवून आणल्याची माहिती आहे.या प्रकरणात आरोपी चालकाविरोधात गंभीर कलमांतर्गत कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्याच्यावर भारतीय दंड संहितेतील कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून तपास वेगाने सुरू आहे.या घटनेनंतर पुन्हा एकदा शहरात सुरक्षितता, वाहतूक सेवा आणि सार्वजनिक ठिकाणांवरील हिंसाचार यावर चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.