तभा वृत्तसेवा
वणी,
raid-illegal-liquor-sale : वणी पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत लालगुडा चौपाटी परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी पोलिस ठाण्यातील हवालदार सतीश बारसागरे, पोलिस ललित व शंकर हे मंगळवार, 10 जूनला सकाळी पोलिस ठाणे हद्दीत गस्तीवर असताना लालगुडा चौपाटी, भालर रोड येथे एक व्यक्ती विनापरवाना देशी दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
या कारवाई दरम्यान नंदू उर्फ लक्की संभाजी मेश्राम (वय 34, जुना लालगुडा) हा अवैधरित्या देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्या ताब्यातील नायलॉन पिशवीची झडती घेतली असता रूपेश संत्रा कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 मिली क्षमतेच्या 17 प्लॅस्टिक बाटल्या आढळून आल्या.
आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलिस करीत आहेत.