देवळीत पालकमंत्र्यांचा जनसंवाद

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
देवळी,
Wardha जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा विशेष जनसंवाद कार्यक्रम शनिवार १३ रोजी दुपारी ३ वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे.
 

Wardha Guardian Minister public dialogue program 
पालकमंत्री डॉ. भोयर नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी, समस्या आणि विविध विकास कामांबाबत सूचना जाणून घेणार आहेत. जनसंवाद कार्यक्रमाला आ. राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागांकडून तत्काळ चर्चा होऊन आवश्यक त्या उपाययोजनांना Wardha  गती मिळणार आहे. प्राप्त तक्रारींचे त्वरित निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक निर्देशही देण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने वर्धा तालुका, देवळी व परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.