पावसाची प्रतीक्षा अन् वर्धेत पाणी आकाशात

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
वर्धा,
water pipeline burst नैसर्गिक उन्हाळा संपला आहे. पावसाळ्यातील महत्त्वाचे मृग नक्षत्र लागले आहे. गेल्या काही वर्षांपासुन वर्धा शहरात दोन दिवस आड पाणी पुरवठा होतो. उन्हाळ्यातही तशीच स्थिती होती. जिल्ह्यात शहर सोडून सर्वत्र पाऊस येऊन गेला. वर्धा मात्र पावसासाठी आसुसले आहे. पावसाची वाट पाहणे जलवाहिणीला असह्य झाले. तिचाही तोल सुटला आणि चक पाईप फोडून पाणी आकाशाकडे झेपावले.
 

Wardha water pipeline burst 
शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी येळाकेळी परिसरात अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे. जलवाहिनीतून अनेक फूट उंच पाण्याचे कारंजे उसळून धबधबा तयार झाला होता. या घटनेमुळे वर्धा शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम water pipeline burst होण्याची शयता व्यतकेली जात आहे. सकाळी येळाकेळीजवळील मुख्य पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.