नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड जिल्हा शाखा तर्फे जागतिक नेत्रदान दिन रॅलीची सांगता

    दिनांक :11-Jun-2026
Total Views |
बुलडाणा,
world eye donation day राधेश्याम चांडक, अध्यक्ष याचे मार्गदर्शनाखाली नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड (राष्ट्रीय अंध कल्याण संघ) बुलडाणा, व बुलडाणा ऑप्थल्मिक सर्जन सोसायटी बुलडाणा, तसेच विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटी यांचे संयुक्त विद्यमाने दि. १० जून रोजी नेत्रदान जीवनदान ह्या जनजागृती मोहिम रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संगम चौक बुलडाणा येथून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, यांनी रॅलीला हिरवी झंडी दाखून संगम चौक ते जयस्तंभ चौक मार्गे प्रस्थान करण्यात आले.
 
 
 
world eye donation day
 
 
रॅलीमध्ये सामान्य रुग्णालय नर्सिंगचे विद्यार्थी व वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी यांचा रॅलीमध्ये प्रामुख्याने सहभाग होता. रॅलीत नेत्रदाना विषयाचे फलक लावून नेत्रदान श्रेष्ठदान मरणोपरांत नेत्रदान करा बाबतच्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला होता. अश्याप्रकारच्या रॅलीचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा संस्थेचे कार्यालय, गांधी भवन जयस्तंभ चौक बुलडाणा येथे रॅलीचे आगमन झाले. ह्या रॅलीत सहभाग झालेल्या सर्वांना नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा, तर्फे फळांचे व कोल्डींगचे वाटप करण्यात आले. जागतिक दृष्टिदान बद्दल मा.संग्राम पाटील ठाणेदार बुलडाणा, यांनी नेत्रदानाचे महत्व समजावून सागितले डॉ. जोशी, डॉ. शोन चिंचोले, यांनी थोडयात नेत्रदान जनजागृती बद्दल माहिती सांगितली.world eye donation day नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणाचे सचिव डॉ. वसंतराव चिंचोले वरिष्ठ नेत्रतज्ञ बुलडाणा यांनी आपल्या भाषणात सांगितलेकी नेत्रदाना मुळे कॉर्नियल अंधत्वामुळे अनेक रुग्णांना अंधारात चाचपरत राहावे लागते, त्यांच्या आत्मविश्वास कमी होऊन त्याचा परिणाम त्यांच्या उपजिवीकेवर होतो.
रॅलीमध्ये प्रा. रामकृष्ण म्हस्के उपाध्यक्ष, अध्यक्ष विदर्भ ऑप्थल्मिक सोसायटी डॉ. विकास बाहेकर, डॉ. रवी शिंदे, डॉ. छाजेड, दिलीप नागरिक. मांगीलाल बुरड व सदस्य/कर्मचारी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा. वसंतप्रभा नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी शिक्षकवृंद, सामान्य रुग्णालयाचे कर्मचारी, विद्यार्थी व शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी ह्या रॅलीत आपला सहभाग नोंदवला. रामकृष्ण म्हस्के यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन केले व डॉ. रवी शिंदे यांनी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईड बुलडाणा, संस्थेतर्फे सर्वांचे आभार मानले.