बोस्टन
anti-aging drug वाढते वय थांबवणे हे वैद्यकीय शास्त्रासमोरील मोठे आव्हान पेलण्यास माणूस सज्ज झाला आहे. म्हणजेच वृद्धत्व थांबवणाऱ्य औषधाची मानवावरील पहिली चाचणी सुरू झाली आहे. पहिल्यांदाच वयाचा परिणाम उलटवणारे इंजेक्शन एका व्यक्तीला देण्यात आले आहे.
अमेरिकेतील बोस्टन येथील बायोटेक स्टार्टअप ‘लाइफ बायोसायन्सेस’ने सांगितले की, त्यांच्या पहिल्या रुग्णाला सेल्युलर रीप्रोग्रामिंगचे इंजेक्शन देण्यात आले आहे. या चाचणीअंतर्गत हे इंजेक्शन ग्लुकोमा (काचबिंदू) ने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या एका डोळ्याच्या बुबुळात लावण्यात आले आहे. या चाचणीचा मुख्य उद्देश वाढत्या वयामुळे कमकुवत झालेल्या पेशींना पुन्हा तरुण आणि सक्रिय बनवणे हा आहे. पुढील 6 महिने वैज्ञानिक याच्या परिणामांवर आणि दुष्परिणामांवर लक्ष ठेवतील.
anti-aging drug उंदरांवर आणि माकडांवर यशस्वी चाचणी
आता डॉक्टर आणि वैज्ञानिक येत्या काही महिन्यांपर्यंत रुग्णावर बारकाईने लक्ष ठेवतील, जेणेकरून ही तंत्रज्ञान मानवी शरीरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही हे सुनिश्चित करता येईल. या थेरपीमध्ये, सर्वप्रथम रुग्णाच्या डोळ्यात एक सिंगल जीन थेरपी इंजेक्शन देण्यात आले आहे. यानंतर काही आठवड्यांपर्यंत अँटीबायोटिक औषधांचा एक विशेष कोर्स केला जाईल.
anti-aging drug हे अँटीबायोटिक औषध शरीरात जाऊन त्या तीन उपचार करणाèया जनुकांसाठी ‘ऑन स्विच’ म्हणून काम करेल, जे पेशींना रीप्रोग्राम (तरुण) करण्यास सुरुवात करतात. यापूर्वी उंदरांवर आणि माकडांवर केलेल्या चाचणीत, याने त्यांची दृष्टी यशस्वीरित्या परत आणली होती. या थेरपीसाठी मानवी डोळ्याची निवड यासाठी करण्यात आली आहे, कारण डोळा शरीराच्या इतर भागांपेक्षा वेगळा आणि सुरक्षित असतो. यामुळे दुष्परिणामांवर लक्ष ठेवणेही सोपे होते.