आता ‘नीट’ काळजीपूर्वक होणार

एनटीएकडून नवी गाईडलाईन जारी

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली
neet exam नीट परीक्षांच्या उडालेल्या गोंधळानंतर एनटीएने मोठा निर्णय घेत, पुन्हा होणाèया परीक्षांबद्दल मोठी माहिती दिली आहे. 21 जून 2026 रोजी होणाèया नीज यूजी परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची सोय लक्षात परीक्षेत मोठे बदल करण्यात आले आहेत. एनटीएने परीक्षेचा एकूण कालावधी वाढवून 195 मिनिटं केला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. याव्यतिरिक्त, प्रश्नपत्रिकेत ‘रफ वर्क’ करण्यासाठी अधिक जागा दिली जाईल. विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या अभिप्रायावर आधारित आणि परीक्षा प्रक्रिया सुलभ करण्याच्या उद्देशाने हे बदल लागू करण्यात आले आहेत.
neet ug
 
एनटीएने सांगितल्यानुसार, परीक्षेचा कालावधी वाढवून 195 मिनिटे करण्यात आला आहे. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या कालावधीमध्ये अटेंडेंस शीट स्वाक्षरी करणे आणि परीक्षेसंबंधी इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेचाही समावेश आहे.
विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे महत्त्वाचे बदल करण्यात आल्याचं एनटीएने स्पष्ट केलं आहे. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे त्यांच्या परीक्षेच्या वेळेवर कोणताही परिणाम होऊ नये, हे सुनिश्चित करणं हा यामागचा उद्देश आहे.

neet exam रफ वर्कसाठी नव्या पानाची व्यवस्था
एनटीएने 2026 ने परीक्षाकाळात रफ कामासाठी देखील बदल केले आहे. आता विद्यार्थ्यांना रफ कामासाठी म्हणजे कच्च्या कामासाठी, कॅलकुलेशन आणि आकृत्या काढण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक जागा दिली जाईल.
यापूर्वी, कच्च्या कामासाठी केवळ प्रश्नपत्रिकेच्या शेवटचं एक पान दिलं जात होतं. आता, रफ कामासाठी प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीलाही पाने उपलब्ध असतील. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीनुसार काम करण्यास मदत होईल.