नागपूर ,
Adhik Maas अधिकमासानिमित्त शिव इलाईट टाऊनशिपमधील काही महिलांनी मोबाईलच्या माध्यमातून श्रीमद्भागवत वाचनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. "श्रीमद्भागवत कथा" हा व्हॉट्सॲप समूह तयार करण्यात आला. त्यावर विदुषी सुषमा गलगलीकर यांनी लिहिलेल्या २०५ भागांच्या श्रीमद्भागवत लेखमालेचे वाचन करण्यात आले.
२५ मे ते ९ जूनदरम्यान सलग १६ दिवस दररोज पूजन, श्रीमद्भागवत वाचन आणि विष्णुसहस्रनाम पठण असा कार्यक्रम पार पडला. १० जून रोजी पारणे करून संकल्पाची सांगता करण्यात आली.Adhik Maas या उपक्रमातून आध्यात्मिक अनुभूती, जीवनमूल्यांचे मार्गदर्शन आणि श्रीमद्भागवताचा प्रचार-प्रसार झाल्याची भावना सहभागी महिलांनी व्यक्त केली. सुषमा गलगलीकर यांनीही आपल्या लिखाणाचा अधिकाधिक लोकांना लाभ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
सौजन्य:वर्षा देशपांडे,संपर्क मित्र