शेतकरी व आविका संस्थांच्या समस्या निकाली काढाव्या

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
कुरखेडा, 
adivasi vikas mahamandal गडचिरोली हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथे शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत आदिवासी विकास महामंडळामार्फत शेतकर्‍यांच्या धान व मका उत्पादनाची खरेदी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून केली जाते. मात्र खरेदी प्रक्रियेदरम्यान संस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
 
 
changdev
 
विकास कामाची पाहणी करण्यासाठी कुरखेडा दौर्‍यावर आलेले मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत भेट घेऊन चांगदेव फाये यांनी विविध समस्यांकडे लक्ष वेधले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत नागीलवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
निवेदनात नमूद करण्यात आले की, धान खरेदी करणार्‍या सहकारी संस्थांना देय असलेले कमिशन व हँडलिंग (लेबर) चार्जेस वेळेवर मिळत नाहीत. खरेदी प्रक्रिया संपून तीन महिन्यांहून अधिक कालावधी लोटूनही अनेक संस्थांना अद्याप रक्कम प्राप्त झालेली नाही. त्यामुळे संस्थांवर आर्थिक ताण निर्माण होत आहे. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये मागील व चालू हंगामातील धान्याची उचल झाली असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र अद्याप धान्याची उचल झालेली नाही. त्यामुळे खरेदी केंद्रांवर जागेची व साठवणुकीची समस्या निर्माण झाली आहे. धान खरेदी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
 
 
adivasi vikas mahamandal  यावर्षी कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका उत्पादन झाले असून शासनाने मका खरेदी केंद्र सुरू केले आहे. मात्र मोठ्या संख्येने शेतकर्‍यांनी नोंदणी केल्यामुळे सर्व नोंदणीकृत शेतकर्‍यांचा मका खरेदी करणे आवश्यक आहे. यासाठी खरेदीची मुदत वाढविणे, खरेदीचे उद्दिष्ट वाढविणे तसेच अतिरिक्त गोदामांची व्यवस्था करणे व वेळेस शेतकर्‍यांचे चुकारे देणे गरजेचे असल्याची मागणी चांगदेव फाये यांनी केली आहे. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा केली.