यवतमाळ नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्या अपमानप्रकरणी आदिवासी बांधवांचा मोर्चा
दिनांक :12-Jun-2026
Total Views |
यवतमाळ,
Adv. Priyadarshini Uike आदिवासी समाज बांधवांच्या वतीने यवतमाळ नगर परिषद अध्यक्षांच्या कक्षात घडलेल्या प्रकरणाच्या संदर्भाने आदिवासी समाजाच्या वतीने स्थानिक यवतमाळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निदर्शने करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पायी चालत जात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले. नगर परिषद कार्यालयात अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी अशोक उईके यांच्या कक्षात बळजबरीने घुसून त्यांना एकेरी भाषेत दादागिरी करणाèया बबलू देशमुख, काँग्रेस गटनेता वैशाली सवाई, कृष्णा पुसनाके व इतर 10 व्यक्तींवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल फौजदारी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
यवतमाळ नगर परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी महिलेला अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला हे काहींच्या पचनी पडले नाही. त्यामुळे छोट्या-मोठ्या कारणावरून त्यांना नेहमीच समाज माध्यमे तथा विविध माध्यमांमधून अपमानित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गुरुवार, 11 जूनला नप अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईकेंच्या कार्यालयात काँग्रेसचे बबलू देशमुख, वैशाली सवाई व कृष्णा पुसनाके यांनी नप अध्यक्षांचा अपमान केला. शहरात सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. शहराच्या विकासासाठी ही मोहीम राबवणे प्रशासनाची जबाबदारी असून ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे.
असे असताना काँग्रेस गटनेत्या वैशाली सवाई यांनी अतिक्रमण काढू नये अशा आशयाचे पत्र देणे हे गैरकायदेशीर आहे. त्यामुळे त्या नपच्या कायदेशीर कामांमध्ये अडथळा आणत आहेत. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, तसेच नप कार्यालयात बळजबरीने घुसून अध्यक्ष अॅड. उईके यांचा अपमान केल्याबद्दल या नेत्यांसह जे कोणी उपस्थित होते, अशांवर शासकीय कामांमध्ये अडथळा आणल्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आदिवासी समाजाने रस्त्यावर उतरून केली आहे. या मोर्चासाठी बंडू मेश्राम, किशोर सलामे, सुभाष गेडाम, रेखा गेडाम, पुरुषोत्तम घोडाम, विजय मडकाम, अशोक गेडाम, राजेश नागभिडकर, राजू गेडाम, हर्षल आडे, किशोर सलामे, अरण पोयाम, पवन मंगाम, निलेश चांदेकर, अविनाश पेंदाम, बादल सराटे, यश सराटे, आशिष मसराम, मंदा मडावी, वंदना पोयाम, ज्योत्स्ना पोयाम, डॉ. शितल मडावी, वर्षा तिरणकर, संजीवनी पोयाम, शोभा उईके, निकिता उईके, आश्विनी पोयाम, आरती कुळसंगे, पायल पोयाम, पार्वता उईके व शेकडो समाजबांधव उपस्थित होते