डॉ. विजय पर्बत यांचा वाढदिवस सेवाभावाने साजरा

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
वृक्षारोपणातून दिला निसर्ग जपण्याचा संदेश
 
आजनसरा, 
ajanasra केक कापून होणार्‍या वाढदिवसांपेक्षा माणसं जोडणारा, रोजगार देणारा आणि निसर्ग फुलवणारा वाढदिवस आजनसरावासीयांनी अनुभवले. संत भोजाजी महाराज देवस्थानचे अध्यक्ष तथा जेष्ठ नागरिक सेवा प्रतिष्ठान नागपूरचे संयोजक डॉ. विजय पर्बत यांचा वाढदिवस पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश साजरा करण्यात आला.
 
 
ajansara
 
डॉ. पर्बत देवस्थानचे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी सेवेला चळवळ बनवले. त्यांच्या नेतृत्वाखाली राबवलेल्या विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आजवर शेकडो तरुणांच्या हाताला काम मिळाले. वाढदिवसानिमित्त त्यांनी धूपबत्ती प्रकल्पातील सर्व माता-भगिनींना माहेरची आठवण म्हणून साड्यांची भेट दिली. मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. विजय पर्बत यांनी हे देवस्थान केवळ धार्मिक केंद्र न राहता सामाजिक दायित्वाचे केंद्र व्हावे यासाठी आपली धडपड आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शेवटच्या माणसापर्यंत सेवा पोहोचवणे हेच माझे व्रत असल्याचे डॉ. पर्बत यावेळी म्हणाले.
 
 
या प्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष धनराज मेश्राम, सचिव शिवदास पर्बत, नामदेव गाढवे, राजेंद्र ढवळे, रमेश ठाकरे, रामा कोपरकर, विनोद आष्टनकर, श्रावण काचोळे, महेश कोसूरकर, शालिनी ईखार, सुरक्षा पर्यवेक्षक रमेशभाई पुसदेकर, सेवार्थ हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. संदीप लोंढे, वैद्यकीय अधिकारी ऋषिकेश जहागीरदार, स्नेहल चिडे, अभिषेक उगे, आदी उपस्थित होते.